भागवत गीता आणि तुमचे आर्थिक नियोजन.

आज महागाई आणि खर्च वाढत चाललेल्या जगात माणसे अधिकचे पैसे कुठून आणता येतील ह्या विचारात आहेत. 

काही जण त्यांना म्हणत आहेत की हा सगळा मोह आहे हा सोडून द्या…तर काही जण सांगत आहेत अधिक अधिक पैश्या मागे धावा! 

त्यात श्रीमंत होणे हे जणुकाही पाप आहे अशी तर शिकवण आहेच. अशा परिस्थितीत नक्की श्रीमंत व्हायला प्रयत्न करावे की करुच नये? हा सवाल ही अर्जुनाला पडलेल्या युद्ध करावे की करु नये ह्या सारखाच आहे आणि ह्या अर्थ कुरुक्षेत्रावर, भीतीने, मोहाने विचलित होणारे मन स्थिर करून आपल्या उदिष्टाप्रमाणे रथाला चालवत न्यायचे असेल तर भागवत गीतेतील वचने वापरून आपले आर्थिक आयुष्य आखले गेले तर आयुष्य जगण्याची रंगत वाढेल आणि परदेशी लाँग टर्म होल्ड ही कल्पना मुळात भारतीयांना आपल्या संस्कृतीशी जोडलेली नसल्याने कळत नाही…आणि गुंतवणूक केली तर जाते दीर्घ मुदत सांगून मात्र मार्केट ३०% खाली उतरले की एस आय पी थांबविण्याकडे मन धावते. हे का होते तर मार्केट खाली ही जाते केवळ वर जात नाही हे माहीत आहे पण आपले मन मानत नाही. अर्जुनाला ही कौरवांची भूमिका अन्याय आहे हे माहित होते पण मन भावंडांच्या विरोध युद्धं करायला मानत न्हवते. 

त्यावेळीच भागवत गीता श्रीकृणाला मांडावी लागली आजच्या आर्थिक आयुष्याचा कुरुक्षेत्रावर उभ्या असलेल्या प्रत्येक अर्जुनाला मार्गदर्शन करण्यासाठी मी ही ह्या गीतेचाच आधार घ्यायचे ठेवले आहे त्यामुळे हा माझापुस्तक रुपी प्रयत्न मला घडवणाऱ्या माझ्या प्रिय गुरुजनानां आणि श्री कृष्णाला समर्पित.

धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥ 

घर विकत की भाड्याने? — तुलना
घर विकत घेणे vs घर भाड्याने घेणे

आर्थिक वास्तव, मासिक वहिवाट, आणि दीर्घकालीन स्वप्नांच्या दृष्टीने सोपी तुलना.

🏠 घर विकत घेणे

EMI: ₹35,000
इ एम आय चा ताणजास्त
प्रॉपर्टी टॅक्स, मेंटेनन्सस्वतः भरावे लागेल
हातात उरतात₹25k–₹26k
जीवनशैलीकाटकसरीने 20k मध्ये
अचानक खर्चअधिक कर्ज घ्यावे लागू शकते

💼 नियोजन

  • मुलाच्या भविष्यासाठी: ₹2,000/महिना
  • आरोग्य विमा: ₹1,000/महिना
  • आयुर्विमा: ₹1,000/महिना
  • निवृत्ती गुंतवणूक: ₹1,000/महिना

🧠 भावना व स्वप्न

  • घराचे मालक असल्याची भावना
  • स्वप्न पूर्ण करण्यासाठी: हातात काही नाही
  • चाळीच्या विकासात: मिळेल तेवढंच घर

👵 निवृत्ती पश्चात

  • चाळीचे घर विकून किंवा भाड्याने देऊन पुढचे आयुष्य चालवणे

🏢 घर भाड्याने घेणे

भाडं: ₹12,000
भाडं भरायचा ताणमध्यम
प्रॉपर्टी टॅक्स, मेंटेनन्समूळ मालक भरतो
हातात उरतात₹51,000
जीवनशैलीअधिक सोई-सुविधा घेत 25k मध्ये
अचानक खर्चदर महा ₹6,000 राखीव ⇒ दर वर्षी ₹72,000

💼 नियोजन

  • मुलाच्या भविष्यासाठी: ₹6,000/महिना
  • आरोग्य विमा: ₹2,000/महिना
  • आयुर्विमा: ₹2,000/महिना
  • निवृत्ती गुंतवणूक: ₹5,000/महिना

🧠 भावना व स्वप्न

  • ह्या भावनेचा काही वर्ष त्याग
  • स्वप्नांसाठी दर महा ₹4,000 वेगळा फंड
  • चाळीच्या विकसात अधिकची खोली (स्वप्न/अडचणी फंडातून)

👵 निवृत्ती पश्चात

  • मोठ्या घरात, निवृत्ती फंडातून आरामदायी जीवन

📌 महत्वाचे निरीक्षण

  • EMI तेवढाच राहतो, पण भाडं वाढत जातं. मात्र घराच्या किमतीवर दीडपट व्याज देणे सर्वांसाठी योग्यच असेल असे नाही.
  • कामाच्या स्वरूपानुसार ठिकाण बदलत असेल (उदा. मुंबई/पुणे ⇄ बेंगळुरू/चेन्नई) तर EMI + भाडं दोन्ही भार येऊ शकतो.
  • रिअल इस्टेटचे दर कायमच वाढतात हा समज 2012 नंतर अनेक ठिकाणी कमी ठाम दिसतो.
  • उदा. 1 कोटीचा फ्लॅट (2016) तोच किमतीला (2020) — महागाई ~4%/वर्ष धरली तर खरेदीशक्तीने 16% कमी किंमतीत विकला गेल्याप्रमाणे.
  • आर्थिक निर्णय हे काळ-सापेक्ष असतात — 1970 विरुद्ध 2020 मध्ये संदर्भ पूर्ण वेगळा.
  • उद्योजकतेचे स्वप्न असेल तर EMI गुलामगिरी सुरूवातीच्या 3–5 वर्षातील अनिश्चित उत्पन्नात अडथळा ठरू शकतो.

🔎 तुम्ही काय प्राधान्य देता?

स्वतःची प्राधान्ये ठरवा — स्थिरता vs लवचिकता, भावना vs रोख प्रवाह, सध्याचे शहर vs संभाव्य बदली.

कॅशफ्लो जोखीम लवचिकता महागाई निवृत्ती कुटुंबाची उद्दिष्टे
टीप: वरील आकडे (₹35k EMI / ₹12k भाडे) उदाहरणासाठी. तुमच्या उत्पन्न, डाउनपेमेंट, व्याजदर, शहर/स्थान यावर प्रत्यक्ष गणित वेगळे असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *