आर्थिक जाणिव ही गोष्ट कालसापेक्ष असते.जी गोष्ट ज्या काळात अतिशय योग्य आहे तीच तीस वर्षा नंतर करणे योग्य राहीलच असे नाही.

घर विकत घेणे vs भाड्याने घेणे — आर्थिक विचार

घर विकत घेणे का — की घर भाड्याने घेणे? (आर्थिक दृष्टीने विचार)

(तंत्रज्ञान, समाज, संस्कृती व पैशाच्या किमती बदलत आहेत — आर्थिक निर्णयही काळानुसार बदलणे आवश्यक आहे.)

ह्याचे कारण काळ जसा बदलतो, तंत्रज्ञान, समाज व्यवस्था, संस्कृती, पैश्याचं मूल्य अशा अनेक नवीन संकल्पना ह्या रुजत असतात. आपल्या मनाची कवाडं उघडी ठेऊन त्याचा विचार केला तर आपल्या सगळ्यांना जाणवेल की आर्थिक निर्णय हे काळा प्रमाणे बदलणे गरजेचे आहे.

घर विकत घेणे ह्या गोष्टीला अपल्याकडे फार महत्व आहे! अगदी आपलं स्वतःच घर असावं हे प्रत्येकाला वाटत असतं पण ते स्वतःच घर बनवणे इतकं एकच ध्येय आज उरलेलं आहे का? मानवी संस्कृती खूप पुढे गेली आहे! करियर च्या सुरवातीलाच एक मोठं कर्ज काढून रिटायर होई पर्यत कर्ज फेड करत राहणे ही संकल्पना आता आउट डेटेड आहे!

काही प्रमाणात शहर किंवा गाव किंवा स्वतःच्या जमिनीवर घर बंधणे त्यासाठी कर्ज घेणे ह्या काही बाबीं मध्ये ही संकल्पना वेगळ्या प्रकारे हाताळावी लागेल. मात्र गावातून येऊन मुंबई-पुण्यात आता नोकरी लागली आहे. आपलं घर असावं ह्या शहरात म्हणून कर्ज घेत असाल तर हा भाग तुमच्यासाठी आहे! चाळीतील जून घर विकून किंवा भाड्याने देऊन त्यात भर टाकून ईएमआय लावून घर घेणार असाल तर हा भाग तुमच्यासाठी ही आहे.

माझ्याकडे आर्थिक मार्गदृशनासाठी एक तरुण जोडपं आलेलं त्यांना एक वर्षाचा मुलगा ही आहे. दोघेही नोकरी करतात, बोरिवली भागात चाळीच्या वस्तीत राहणारे. त्यांना आता वाटत होत आपण आता आपल्या मुलाला काही चाळीत वाढवायचं नाही आपण थोडे आणखी कष्ट करू, तडजोड करू पण आपण फ्लॅट मध्ये राहायचं, त्यासाठी अगदी गावाची जमीन ही विकायला ते तयार होते.

मी म्हणलो आपण शक्यता तपासून पाहूया आणि उपलब्ध पर्याय पाहूया!

त्यांचं दोघांचे पगार मिळून हातात 55 हजार दर महिना येत होते मात्र दोघेही खाजगी क्षेत्रात असल्याने त्यांना पेन्शन वगैरे काही सुविधा नोकरीतून मिळणार न्हवत्या. त्यांचा चाळीच्या घराला आठ हजार रुपये भाडं मिळू शकणार होतं आणि गावची जमीन विकली तर 20 लाख त्यांना मिळणार होते.

आता त्यांना हवा तसा 1बीएचके फ्लॅट 55 लाख रुपयाला (बोरिवली पासून आणखी थोडं लांबवर) उपलब्ध होता. पन्नास लाखाच कर्ज त्यांनी घेतलं तर त्यांना पस्तीस हजार ईएमआय लागणार होते. मी त्यांना विचारलं समजा तेच घर किंवा तसच, त्याच भागात जिथे विकत घ्यायला पाहत असाल तर भाड्याने किती रूपयाला आहे तर उत्तर होतं साधाराण 10 ते 12 हजार!

म्हणजे फक्त आठ हजारात चार हजाराची भर घालून घर भाड्याने मिळू शकतय! त्यांचं म्हणणं होतं की पण मालकीचं नसेल ना ते! आणि सतत 11 महिन्यांनी बदलायला लागेल.

मी त्यांना विचारलं की जर तुम्हाला एकदम नियमित आणि तुमचं घर जपत आजू बाजूच्याना न त्रास देणारा भाडेकरू मिळाला चाळीतल्या घराला तर दर 11 महिन्यांनी बदलाल का त्याला ?

आज शहरांमध्ये असे अनेक फ्लॅट आहेत जे विकत घेतले आहेत परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी! त्यांना काँट्रॅकट बदलायला, सही करायला यायचा खर्च ही वर्षाच्या भाड्या पेक्षा जास्त आहे. त्यांना कोणीतरी विश्वासू आणि नियमित भाडं देणारा भाडेकरू हवाच आहे. थोडं शोधलंत तर असे फ्लॅट मिळणं कठीण मुळीच नाही.

पंचावन्न हजर अधिक आठ हजार म्हणजे उत्पन्न 63 हजार आणि इ एम आय जाणार 35 हजार म्हणजे हातात राहणार केवळ अठ्ठावीस हजार त्यातून मेंटेनन्स, प्रोपेटी टॅक्सचा खर्च ही विकत घेतल्यास करावा लागेलच, जो भाडयाने घेतलं तर करावा लागणार नाही!

म्हणजे साधारण 26 हजार रुपयात तुम्हाला घर ही चालवायचय आणि मुलाचं शिक्षण जस सुरु होईल त्या प्रमाणे खर्चही वाढत जाणार, त्यातून तुम्ही त्याच्या पुढील शिक्षण, तुमचं रिटायरमेंटसाठीची सोय ह्या सगळ्यात पुढची वीस वर्ष आर्थिक ताण सहन करत जगणं सोपं आहे का?

हे सगळं करून लोन फिटले जाईल,घर स्वतःच होईल पण निवृत्तीसाठी कितीसे पैसे वाचवू शकाल? निवृत्ती पश्चात तुम्हाला पेन्शन ही नसणार. अशा वेळी निवृत्ती नंतर ही आयुष्य कटकसर करतच जगावं लागेल!

एक मालकीचं घर मिळवण्यासाठी आयुष्यभर आर्थिक होरपळ का सहन करावी?

ह्या उलट चाळीच घर भाड्याने देऊन त्यात चार हजार अधिक घालून छान जगता येईल की हव्या तशा फ्लॅट मध्ये! आणि 55 हजार उत्पनातील 51 हजार जर असतील हातात तर ज्या सत्तावीस हजारात सगळं भागवणार होतात त्यासाठी 24 हजार अधिक मिळतायत ज्यातून जीवनशैली ही उत्तम ठेऊन निवृत्तीसाठी, मुलाचा पुढील शिक्षणासाठी मोठी रक्कम निर्माण करू शकाल,अशी रक्कम ही गुंतवायला उपलब्ध राहील!

काही वर्षात जेव्हा तुमची चाळ एखादा विकासक जेव्हा विकासासाठी घेईल तेव्हा तुमच्या ह्या वाचलेल्या खर्चातून तुमच्या चाळीच्या जागी उभ्या राहिलेल्या बिल्डिंग मध्ये ही एखादी खोली अधिकची घेऊ शकाल अशी रक्कम अगदी दहा ते बारा वर्षात ही जमलेली असेल!

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इ एम आय चा दर महिन्याचा ताण डोक्यावर नसेल तर जगणं किती सुसह्य होईल! ह्यात अडचण फक्त घर बदलाव लागलंच तर मात्र जेव्हा इ एम अय चा ताण नसेल तेव्हा हातात त्यासाठी पुरेस पैसे ही असतील. तेव्हा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी झगडायला पैसे हातात असतील तर समस्या कितीही टोकेरी असल्या तरी त्याची टोकं बोथट करायचं आर्थिक सामर्थ्य तुमच्याकडे असलेल्या आर्थिक ताकदीत असेल.

घर विकत घेणे — घर भाड्याने घेणे (तुलना)

घर विकत घेणे

  • इ एम आय चा ताण (35 हजार)
  • प्रॉपर्टी टॅक्स, मेंटेनन्स चा खर्च — स्वतः करावा लागतो
  • हातात उरतात 25 ते 26 हजार
  • काटकसरीने जगणं 20 हजारात!
  • अचानक आलेल्या खर्चासाठी अधिक कर्ज काढावे लागेल.

घर भाड्याने घेणे

  • भाडं भरायचा ताण (12 हजार)
  • मूळ मालक प्रॉपर्टी टॅक्स व मेंटेनन्स भरतो
  • हातात उरतात 51 हजार
  • अधिक सोयी सुविधा घेऊन जगणे 25 हजारात!
  • दर महिना सहा हजार राखीव ठेवल्यावर वर्षातून 72 हजार जमत जातील — कर्ज नको.

व्यक्तिगत खर्चांचे साधरण तक्ते

विषयघर विकत घेणेघर भाड्याने घेणे
मुलाच्या भविष्यासाठीदो हजारसहा हजार
आरोग्य विमा1 हजार2 हजार
आयुर्विमा1 हजार2 हजार
निवृत्तीसाठी गुंतवणूक1 हजार5 हजार
स्वप्न पूर्ण करण्यासाठीहातात काही नाहीदर महा 4 हजार

चाळीच्या विकासात सर्वाना मिळेल तेवढच घर — स्वप्नांसाठीचा आणि अडचणीसाठी ठेवलेल्या फंडातून चाळीच्या विकासात अधिकची खोली घेता येईल.

निवृत्ती पश्चात — चाळीचे घर विकून किंवा भाड्याने देऊन आरामदायी जीवन. मोठ्या घरात निवृत्तीचा मोठ्या फंडातून आरामदायी जीवन मिळू शकते.

आता ठरवा — घर घेतलं स्वतःच हे मिरवून आर्थिक जोखडा खाली जगायचं की हे जोखाड न घेत आयुष्य आनंदी जगायचं! इ एम आय तेवढाच राहील भाडं मात्र वाढत जाईल मात्र त्यासाठी घराच्या रकमेच्या दीडपट व्याज भरणे हा माझ्या मते तरी चांगला आर्थिक निर्णय ठरत नाही!

मित्रांनो — ह्यातील उदाहरण हे एक कुटुंब विषयी आहे परंतु सध्याची तरुण पिढी जी कामामग्रीमुळे कुठे राहावं लागेल ह्याची काहीही शाश्वती नसलेली — त्यांना मुंबई-पुण्यात घर विकत घ्यायला लावून ही समजा बंगलोर किंवा चेन्नईला जावं लागलं तर तिथे पुन्हा भाड्याने राहणं आहेच!

ज्यांचं कामाच स्वरूप असेल त्यांनी एम आई आणि भाडं असं दोन्हीकडे खर्च होऊन रिअल इस्टेट मध्येच जास्तीत जास्त गुंतवणूक होत राहते! आणि रिअल इस्टेट म्हणजे भाव वाढतच जाणार हे 2012 पर्यंत झाले असेल पण त्यानंतर होताना दिसतय का?

माझे एक मित्र 2016 पासून 1 कोटीला फ्लॅट विकायचं म्हणत होते! त्यांचा फ्लॅट 1 कोटीलाच 2020 साली विकला गेला. ह्या चार वर्षात महागाईचा वाढीचा वेग 4% धरूनही 16% स्वस्त विकावा लागला म्हणावं लागेल! अशा काळात आपण आहोत. म्हणून सुरवातीला मी म्हणालो की आर्थिक निर्णय हे काल सापेक्ष असतात!

1970 साली घर विकत घेणे आणि 2020 साली — ह्यात पन्नास वर्षाचा आर्थिक काळ गेला आहे! ज्यात अनेक स्थित्यन्तर झाली ज्याने मानवी जगणे भरपूर बदलून गेले.

आपल्याला जे महत्वाचं वाटत ते आपण निवडावं!

गाठीशी गावाकडची जमीन किंवा तदसम असेट असेलही तर ती कोण बनवेल? करोडपतीची लाईन बनवणारी लाईन प्रमाणे आहे. ती आपण आयुष्यातला कोणता प्रश्न सोडवायला वापरायची? का राखून ठेवायची? हा प्रश्न प्रत्येक बाबतीत बदलतो.

शेवटी इतकंच सांगतो — धीरुभाई अंबानी यांना व्यवसायिक व्हायचं स्वप्न जास्त मोठं वाटलं. त्यांनी मुंबईत आल्यावर पहिली अठरा वर्ष भाड्याच्या घरात संसार केला! तेव्हा भारतातील सगळ्यात मोठी कंपनी चालवतो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *